वाबळे दांपत्याच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० नागरिकांची तपासणी, २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप

अहिल्यानगर | जैनवार्ता गुलमोहर रोडवरील आम्रपाली गार्डन येथे माजी सैनिक मनसुख वाबळे आणि शालिनी वाबळे यांच्या वतीने आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यजागृतीच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला असून, २०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. रामदास बांगर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अतुल…

फ्लडलाईटखाली प्लास्टिक बॉल क्रिकेटचा जल्लोष; स्टेशन स्टार्सचा विजय, एकनाथ नगर उपविजेता

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य फ्लडलाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल अकरा दिवस रंगलेल्या या स्पर्धेत शहर तसेच तालुक्यातील अनेक संघांनी दमदार कामगिरीची नोंद केली. अंतिम फेरीत स्टेशन स्टार्स संघाने उल्लेखनीय खेळ करत विजेतेपद पटकावले, तर एकनाथ नगर संघाने उपविजेतेपदावर समाधान मानले. वांबोरी संघ तृतीय क्रमांकावर राहिला. विजेत्या…

पिंपळगाव माळवी येथे ३ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन; अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध ३ कोटी ४१ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामांचा शुभारंभ युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. या विकास प्रकल्पांत पिंपळगाव ते लक्ष्मीनगर डांबरीकरण रस्ता, सटुबाई रोड, भोसले…

सकल मराठा परिवारकडून भव्य रक्तदान शिबिर — “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” संदेशाने उजळला समाजभाव

शेवगाव | जैनवार्ता सामाजिक बांधिलकी जोपासत सकल मराठा परिवार यांच्या वतीने ता. १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव, अहिल्यानगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, दिले जाणारे प्रत्येक थेंब रक्त सर्व समाजातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी उपयोगी पडणार…

प्रलंबित मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांचे निदर्शन आंदोलन; हिवाळी अधिवेशनात ‘महामोर्चा’ची घोषणा

अहिल्यानगर | जैनवार्ता महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अहिल्यानगर येथे मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तासांचे निदर्शन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाचे लक्ष प्रलंबित मागण्यांकडे वेधण्यात आले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘’महामोर्चा काढण्याची घोषणा समितीने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिल्लीतील लाल…

मौलाना अबुल कलाम आजाद जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा — अहमदनगर किल्ल्यात होणार कार्यक्रम

अहिल्यानगर | जैनवार्ता स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न आणि देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, रहेमत सुलतान फाऊंडेशन आणि अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अहमदनगर किल्ल्यातील ‘नेता कक्ष’…

अहिल्यानगरच्या रणरागिणींचा राज्यस्तरीय कबड्डीतील डंका! आनंद विद्यालयाच्या किशोरी गटाचे उपविजेतेपदाने नगरचा गौरव

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगरच्या रणरागिणींनी आपल्या जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर राज्यस्तरीय किशोरी गटाच्या कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत नगर जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर तसेच आनंद विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसन तरटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अष्टेकर आणि…

आत्मध्यानाने मिळते अंत:शांती — आनंदधाम येथे आत्मध्यान शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | जैनवार्ता आजच्या धकाधकीच्या युगात माणूस पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना अंत:शांती गमावून बसला आहे. अशांत मनःस्थिती आणि तणावामुळे समाजात आजार, नैराश्य आणि असंतुलन वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आत्मध्यान ही एक अशी साधना आहे जी व्यक्तीला अंतर्मुख करते आणि जीवनात शांती व समभाव निर्माण करते. अशा आत्मशांतीचा संदेश देणारे संत विभूती, महाराष्ट्र…

अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगमुळे क्रीडाक्षेत्राला नवी ऊर्जा — जिल्हाधिकारी पंकज आशिया नमोह फुटबॉल क्लब तर्फे स्पर्धेचे भव्य आयोजन; उदयोन्मुख फुटबॉलपटूंना प्रशिक्षण व संधी

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारी अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धा नमोह फुटबॉल क्लब तर्फे नगर क्लब मैदानावर सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काढले. त्यांनी नमोह फुटबॉल क्लबच्या प्रयत्नांचे कौतुक करत क्रीडा संस्कृती बळकट करण्याचे आवाहन केले. स्पर्धेचे आयोजन नगरच्या प्रसिद्ध क्रीडा प्रशासक…

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण; अहमदनगर महाविद्यालयात सामूहिक गायनाने गुंजला देशभक्तीचा सूर

अहिल्यानगर | जैनवार्ता ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथे सामूहिक गायनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास मंडळ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार आणि सकारात्मक सामाजिक…