Agriculture | सेन्सरयुक्त स्मार्ट शेतीचा नवा अध्याय; डॉ. प्रणव पावसे यांच्या संशोधनाला ‘नाबार्ड’चा राष्ट्रीय गौरव

संगमनेर | २२.२ | नितीनचंद्र भालेराव (Agriculture) रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा पोत ढासळत असताना आणि त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जाणवत असताना, संगमनेरच्या एका युवा संशोधकाने शेतीसाठी अभिनव उपाय सुचवला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुपुत्र डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांच्या पीएच.डी. संशोधनाला National Bank for Agriculture and Rural Development (नाबार्ड) कडून २०२३ सालचा…

सायबर रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ पकडला; लाओसमधून ऑनलाईन गुंतवणूकीचा ट्रॅप अहमदाबाद विमानतळावर अटक

सोलापूर | २१.२ | प्रतिनिधी सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करून मोठी कामगिरी बजावली. लाओस येथे वास्तव्यास राहून आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर रॅकेट चालवणारा ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय ४७, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला लुक आऊट नोटीसच्या आधारे ९ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद…

धोत्रे जि. प. शाळेचा ‘मातीशी नातं’ उपक्रम; शाळेतच शेतीमालाची थेट विक्री

पारनेर | प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे शिक्षकांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘मातीशी नातं’ या उपक्रमामुळे शिक्षणासोबतच ग्रामविकासालाही नवी दिशा मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेत स्वतंत्र ‘मातीशी नातं’ कक्ष सुरू करण्यात आला असून गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल व कडधान्ये थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळत असून…

प्रलंबित मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांचे निदर्शन आंदोलन; हिवाळी अधिवेशनात ‘महामोर्चा’ची घोषणा

अहिल्यानगर | जैनवार्ता महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने अहिल्यानगर येथे मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक तासांचे निदर्शन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून शासनाचे लक्ष प्रलंबित मागण्यांकडे वेधण्यात आले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ‘’महामोर्चा काढण्याची घोषणा समितीने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिल्लीतील लाल…

संजय गांधी निराधार योजनेला नवे डिजिटल रूप; मंजुरी आदेश थेट घरपोहोच मिळणार

अहिल्यानगर | प्रतिनिधी कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या ‘निराधार मित्र’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्जस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, मंजुरी आदेश थेट घरपोहोच मिळणार आहेत. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच आदेश सेवा” म्हणून राज्यासाठी आदर्श ठरत आहे. संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसाहाय्य योजना ही निराधार…

Ahilynagar job Alerts अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदासाठी तातडीची भरती

अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar job alerts: येथील नवनागापूर MIDC परिसरातील नामांकित क्लासिक व्हील्स लिमिटे या ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. अनुभवी तसेच नवीन (Freshers) उमेदवारांना या भरतीत संधी उपलब्ध आहे. उपलब्ध पदे आणि पात्रता: क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिंग रिक्त जागा 1 GDC Machine Operator SSC/HSC/Any ITI पुरुष 30 2…

वेतनकपात व सुट्ट्यांचे थकित प्रकरण तापले; मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचा राज्यभर कामबंदचा इशारा

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पेमेंट वाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची थकबाकी तत्काळ देण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. श्रीरंग गिते तसेच सोपान शिंदे, रवी…

सात दशकांची परंपरा जपणारा ‘महावीर फटाका मार्ट’ राजेश रमेश मुनोत यांच्या हस्ते सुरू असलेली दीपावलीची रंगत

अहिल्यानगर | जैनवार्ता भिंगार येथील राम मंदिर, घास गल्ली परिसरात असलेला महावीर फटाका मार्ट हा दिवाळीच्या खरेदीसाठीचा एक विश्वासार्ह ठिकाण ठरला आहे. तब्बल ७० वर्षांपासून अखंडपणे सेवा देणारे हे दुकान दिवाळीचा उत्सव उजळवत आहे. गाळा क्रमांक २ मध्ये कार्यरत असलेले हे दुकान सध्या राजेश रमेश मुनोत यांच्या देखरेखीखाली चालवले जाते. सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरातील…

शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग — शेतकऱ्याचे दीड एकर ऊस जळून खाक!

जामखेड | जैनवार्ता जामखेड तालुक्यातील जवळा परिसरात आज दुपारी ४ वाजता झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना गट नं. ६४४/१, मोहसीन सत्तार शेख यांच्या शेतात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेख यांच्या शेतातील उसाचा फड वीजवाहिनीच्या अगदी शेजारी होता. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उसावर पडल्याने आग लागली. काही…

Politics | सरकारच्या अल्पमदतीवर शेतकऱ्यांचा रोष; सामनगावात भाकपचा रास्तारोको”

शेवगाव | जैनवार्ता (Politics) अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामनगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”, “प्रतिहेक्टर सत्तर हजार मदत द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Politics) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार…