200 मीटर अ‍ॅथलेटिक्समध्ये सीएसआरडीचा शुभम हंबीररावची इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय गेम्ससाठी निवड

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या CSRD-ISWR समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यूचा विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील युवा धावपटू शुभम अरुण हंबीरराव यांची 200 मीटर अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. Youth Games Council India (YGCI) यांच्या वतीने आयोजित 8th Youth Games Indo-Nepal International Series 2026 या स्पर्धेसाठी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आले आहे….

देशपातळीवरील ‘सुपर १००’मध्ये माथणीच्या मंजुश्री घोरपडेची निवड

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी माथणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी मंजुश्री घोरपडे हिला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘वीरगाथा’ राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी,…

गोव्यात लांब उडीत सुवर्णझेप; धाराशिवचा आदित्य साठे राष्ट्रीय विजेता

  अहिल्यानगर | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र साठे आदित्य अशोक याने ॲथलेटिक्सच्या लांब उडी स्पर्धेत दमदार कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिनांक 20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,…

गोव्याच्या ट्रॅकवर अहिल्यानगरची सुवर्णधाव; शुभम हंबीररावला 200 मीटरमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक

गोवा | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र शुभम सीमा अरुण हंबीरराव याने ॲथलेटिक्सच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे 20, 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील…

शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत ऋचा बोगाने उंचावला अहिल्यानगरचा मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत अहिल्यानगर येथील यंग मेन्स जुडो हॉलची खेळाडू ऋचा राकेश बोगा हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र संघासाठी कास्यपदक पटकावले. या यशामुळे अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव वाढला आहे. ऋचाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ही २७ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत १४…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सीएसआरडीच्या शुभमची सुवर्णझेप; २०० व ८०० मीटर धावण्यात दुहेरी यश

अहिल्यानगर | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य युवा खेल परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी विभागातील एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शुभम सीमा अरुण हंबीरराव याने उल्लेखनीय कामगिरी करत २०० मीटर व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व…

टी-२० विश्वचषक २०२६ : सूर्यकुमारकडे नेतृत्व, अक्षर उपकर्णधार; संघरचनेत मोठे बदल

मुंबई | प्रतिनिधी ( WorldCup )आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत **Board of Control for Cricket in India (बीसीसीआय)**चे सचिव देवजीत सैकिया, मुख्य निवडकर्ता Ajit Agarkar आणि नवनियुक्त कर्णधार Suryakumar Yadav यांच्या उपस्थितीत संघ जाहीर करण्यात आला. ( WorldCup )या स्पर्धेसाठी सूर्यकुमार…

Games दृष्टिहीन शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | प्रतिनिधी (Games)राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र राज्य व जिल्हा शाखा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय अंध मुलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडली. ता. १६ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवून आपली क्रीडाकौशल्ये सादर केली. (Games)या स्पर्धेदरम्यान अंध क्रीडापटूंनी दाखवलेली…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘आनंद सप्ताह’ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि रिमांड होम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित ‘आनंद सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी, आत्मविश्‍वास आणि कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सलग पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रिमांड केंद्रातील सर्व शाळांमध्ये चित्रकला, ब्रेल लेखन, गायन, कथाकथन, नाट्यस्पर्धा आणि क्रीडा…

शालेय कुराश स्पर्धेत बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा दबदबा; मुली व मुलांचा संघ विजेता

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शाळेच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींचा तसेच 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने शहरात प्रथम क्रमांक पटकावत प्रभावी कामगिरी साकारली. मुलींच्या विभागात 9 तर मुलांच्या विभागात 10 खेळाडूंनी सहभाग घेत…