चिमुकल्यांच्या सादरीकरणाने रंगले आनंद पार्श्व प्री-स्कूलचे स्नेहसंमेलन

अहिल्यानगर | जैनवार्ता राष्ट्रसंत आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषीजी म.सा. व संस्कारप्रेरक प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या नवीपेठ येथील आनंद पार्श्व प्री-स्कूलचे ९ वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ऋषीजींच्या पावन नवकार मंत्र जपाने करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी निर्मल बाफना,…