विजयपथाचा मार्ग स्वीकारत विजया कोचर यांची जैन भागवती दीक्षा उद्या

अहिल्यानगर | प्रतिनिधी मानवी जीवनातील शाश्वत सुखाचा मार्ग हा भोगोपभोगात नसून त्याग आणि संयमात दडलेला असल्याचे जैन धर्मात सांगितले जाते. सद्गुरूंच्या सानिध्यातून वैराग्याची जाणीव झाल्यानंतर अनेक जण संयम साधनेचा मार्ग स्वीकारतात. भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या अहिंसा, सत्य आदी पाच महाव्रतांचे पालन करत संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करण्यासाठी जैन भागवती दीक्षेला विशेष महत्त्व आहे….