अहिल्यानगर | जैनवार्ता
( Diwali Celebration ) शिक्षण आणि सामाजिक जाणिवा दृढ करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला साऊंड सिस्टमची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्य देत महिलांनी मुलांसोबत “सामाजिक ऐक्याची दिवाळी” आनंदात साजरी केली.
मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, दीपीका चोईथरमानी, गगन वधवा, अर्चना खंडेलवाल, दिप्ती सबलोक, शेरी धुप्पड, मिनी खत्री, जया मेघनानी, टिना कुमार, गगन बग्गा, रवी नारंग, विमी मक्कर, शिल्पा छाबरा तसेच उत्कर्ष बालभवनच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
यावेळी जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, “दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे. शिक्षणासोबतच मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हा आमचा हेतू आहे.”
डॉ. सिमरन वधवा म्हणाल्या, “या मुलांसोबत दिवाळी साजरी करणं ही अनमोल अनुभूती आहे. प्रेम आणि एकोप्याचा उत्सव साजरा केल्याचा आनंद लाभला.”
सेवाप्रीत फाउंडेशनने पूर्वीही उत्कर्ष बालभवनला विविध स्वरूपात मदत केली असून, नव्या साऊंड सिस्टममुळे उपक्रम, सादरीकरणे व कार्यक्रमांना अधिक प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे.
फराळ आणि भेटवस्तूंनी विद्यार्थ्यांचा आनंद अधिक खुलला. या उपक्रमास शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.



