मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना ‘शिक्षण महर्षी ग. ज. चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार’

अहिल्यानगर | प्रतिनिधी

येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग. ज. चितांबर विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना यावर्षीचा शिक्षण महर्षी ग. ज. चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार विभावरी रोकडे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर नव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, संस्थेचे इतर कार्यकारिणी सदस्य तसेच रोकडे कुटुंबीय उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना विभावरी रोकडे यांनी, चितांबर सरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार अत्यंत गौरवास्पद असून, संस्थेप्रती व शाळेप्रती मी मनःपूर्वक ऋण व्यक्त करते, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी शाळेतील कार्यकाळातील विविध आठवणींनाही उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *