आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी

आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विनायक तोडमल, अश्विनी मगर, माजी सैनिक ज्ञानदेव घोरपडे, शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ जगदाळे, सर्व शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड.विनायक तोडमल म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञानासाठी अभ्यास केला पाहिजे. शिस्त, परिश्रम आणि सातत्य या तीन गोष्टी अंगीकारल्यास यश नक्की मिळते. शिक्षणासोबतच मूल्यांची जोपासना केल्यास देशाचा एक चांगला नागरिक घडतो,” असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले.

चौकट : सन्मानित गुणवंत विद्यार्थी

कु. दारकुंडे गायत्री नवनाथ

चि. प्रज्वल नवनाथ मगर

चि. आढाव चैतन्य सुभाष

चि. कराळे प्रज्वल नवनाथ

कु. गवते शाश्वती राजेंद्र

कु. काळे श्वेता सखाराम

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. जगन्नाथ जगदाळे यांनी श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे आभार मानले. ते म्हणाले की, “प्रतिष्ठान दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते.”

या कार्यक्रमास पालक सुभाष आढाव, वैशाली मगर, रंजना घोरपडे, रामदास ससे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *