मराठी पुस्तकांचा आवाज आता मोबाईलवर; ‘श्रोता’ अॅप सर्वांसाठी उपलब्ध
अहिल्यानगर | प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘श्रोता’ हे मराठी ऑडिओबुक अॅप २७ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कृषीरंग प्रकाशनच्या माधुरी सचिन चोभे यांनी याबाबत माहिती दिली. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि साहित्याचा संगम घडवणारे हे अॅप मराठी वाचक-श्रोत्यांसाठी नवे डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील Google Play…
