jainwarta

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला; परीक्षा परिषदेची नवीन घोषणा

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण…

शालेय कुराश स्पर्धेत बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा दबदबा; मुली व मुलांचा संघ विजेता

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शाळेच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींचा तसेच 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने शहरात प्रथम क्रमांक पटकावत प्रभावी कामगिरी साकारली. मुलींच्या विभागात 9 तर मुलांच्या विभागात 10 खेळाडूंनी सहभाग घेत…

न्यू आर्ट्‌स कॉलेजमध्ये फूड फेस्टिवला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पकतेतून लाखोंची उलाढाल

अहिल्यानगर | जैनवार्ता  न्यू आर्ट्‌स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर) फूड फेस्टिवल उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली….

नवभारत विद्यालय देहरे 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला

अहिल्यानगर | जैनवार्ता नवभारत विद्यालय देहरे येथील 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. तब्बल 31 वर्षांनी सर्व मित्रमंडळी एकत्र येत असल्याने आनंद आणि भावनांचा अनोखा संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला. हा मेळावा अहिल्यानगर येथील हॉटेल मेघनंद येथे पार पडला. राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेले…

लोणी येथे अस्मिता ॲथलेटिक्स लीग; जिल्ह्यातील मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – आयोजकांचे आवाहन

अहिल्यानगर | जैनवार्ता लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या लीगचे मुख्य उद्दिष्ट महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे,…

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेची सुरूवात; लहान मुलांच्या मोबाईल व्यसनाविरुद्ध मोठे पाऊल

पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती आवश्यक – सीईओ आनंद भंडारी अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्‌घाटन उत्साहात पार पडले. समाजात मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य…

भाग्योदय विद्यालयात ‘बदलते हवामान’ व ‘जीआयएस–रिमोट सेन्सिंग’ विषयावर विद्यार्थी सचेत

अहिल्यानगर | जैनवार्ता पर्यावरणातील जलद बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार जगभरात हवामान व जिआयएस–रिमोट सेन्सिंग या विषयांचे महत्त्व वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाग्योदय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात तज्ज्ञांनी हवामान बदलाची कारणे, त्याचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम, तसेच भविष्यात आवश्यक होणारी उपाययोजना याबाबत सखोल माहिती दिली. त्याचबरोबर जिआयएस…

अशोकभाऊ फिरोदिया वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेत धूत स्कूलचा दबदबा; सहिला कोकणे व वरद लोखंडे प्रथम

अहिल्यानगर | जैनवार्ता अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा आणि हिंदी दिनानिमित्त वाद-विवाद स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व. अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वक्तृत्व आणि वाद-विवाद या दोन्ही स्पर्धांतील संघात्मक विजेतेपदाचा फिरता चषक सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविला….

इन्फोसिसची ‘चालती-बोलती विज्ञानशाळा’; ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष विज्ञानानुभव समृद्ध

पारनेर | जैनवार्ता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी इन्फोसिस कंपनीने उभारलेली अत्याधुनिक विज्ञान बस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे दाखल झाली. धोत्रे खुर्द आणि तुफानवस्ती परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या बसला भेट देत प्रत्यक्ष विज्ञानाचा अनुभव घेतला. या अभिनव उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,…

श्रृती मनवेलीकर यांचा अनोखा सामाजिक वसा; सावली संस्थेतील अनाथ मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगावमधील सावली संस्थेत राहणाऱ्या एका अनाथ मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या श्रृती विक्रांत मनवेलीकर यांनी स्वीकारली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवत त्यांनी या मुलीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केला. पालकत्व स्वीकारतानाचा क्षण या निराधार मुलीसाठी आत्मविश्वास व आनंदाचा ठरला….