गुरुनिष्ठेचा तेजोत्सव: श्री कुंदनऋषिजी महाराजांचा ९२ वा जन्मोत्सव साजरा

अहिल्यानगर | जैनवार्ता आनंदधाम हे स्थान केवळ जैन धर्मियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतातील राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या सर्व श्रद्धाळू भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे केंद्रस्थान आहे. १९ व्या शतकात आचार्यश्रींनी मानवतेच्या उध्दारासाठी केलेले कार्य आजही दीपस्तंभाप्रमाणे पथदर्शक ठरले आहे. या तेजस्वी परंपरेत सतत ३० वर्षे गुरूंच्या सेवेत राहून दिव्य उर्जा प्राप्त करण्याचे…

माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचा अमृत महोत्सव शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार गौरव

अहिल्यानगर | जैनवार्ता शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अमृत महोत्सव गौरव समिती व गणित विभाग माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले…

अनुसूचित जाती युवक-युवतींसाठी ‘फ्री’ उद्योजकता प्रशिक्षण २० नोव्हेंबरपासून

अहिल्यानगर | प्रतिनिधी अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्यांचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ २० नोव्हेंबर रोजी होणार असून समारोप १९ डिसेंबर रोजी होईल. हे…

अहिल्यानगरीत गुरुनानक जयघोष; श्रद्धा, एकता आणि भक्तीचा सोहळा

अहिल्यानगर | जैनवार्ता “बोले सो निहाल, सत श्री अकाल” या घोषणांनी अहिल्यानगरी दुमदुमली, जेव्हा शहरात गुरुनानक देवजींची ५५६ वी जयंती (गुरुपुरब) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शीख, पंजाबी आणि सिंधी समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक…

अशोका आर्ट गॅलरीतील सूक्ष्म खडूशिल्पे पाहून मावळे झाले थक्क

अहिल्यानगर | प्रतिनिधी सावेडी उपनगरातील अशोका आर्ट गॅलरीला नुकतीच शिवशाहीर आचार्य हेमंतराजे मावळे यांनी भेट देऊन खडूशिल्पकलेचे अवलोकन केले. या वेळी त्यांनी व्यक्त केले की, “खडूशिल्पात व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव इतक्या स्पष्टपणे दिसणे हेच एक आश्चर्य आहे. दीड सेंटीमीटरपेक्षा लहान असलेल्या या शिल्पांमध्ये कलाकाराने भावना जिवंत केल्या आहेत.” मावळे यांनी गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य, छत्रपती शिवाजी…

“Ahilyanagar Open Chess Tournament – विजेत्याला 1 Lakh Prize!”

अहिल्यानगर | जैनवार्ता शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला एक लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू…

मातृत्वाचा जिव्हाळा; ‘प्रयास’ आणि ‘दादी-नानी’ ग्रुपची निराधार मुलांना प्रेमळ भेट

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील ‘सावली’ संस्थेतील निराधार व गरजू विद्यार्थ्यांना प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्य, अल्पोपहार, फळे आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलका मुंदडा तसेच दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड, उज्वला बोगावत,…

AI नवकल्पकतेला युकेची मान्यता; नगरच्या संशोधकांची AI Powered Supply Chain Device UK Design Patentमध्ये नोंद

अहिल्यानगर | जैनवार्ता जिल्ह्याच्या व्यवस्थापन व औद्योगिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी एक उल्लेखनीय नोंद झाली आहे. बीपीएचईस् च्या आयएमएस (IMS) व्यवस्थापन संस्थेचे प्रा. डॉ. सय्यद मुदस्सर आणि एमआयडीसीतील न्यु-वे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्सचे संचालक व संशोधक डॉ. निलेश पठारे यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या “AI Powered Supply Chain Device” या अभिनव डिझाईनची नोंद युनायटेड किंगडम इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी…

“सरकारी शाळा टिकवणे म्हणजे राष्ट्र टिकवणे – पद्मश्री डॉ. पोपट पवार; ‘आडवाट’ लघुपट प्रदर्शनात शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात”

अहिल्यानगर | जैनवार्ता “सरकारी शाळा या राष्ट्रनिर्मितीचा खरा पाया आहेत. त्यातूनच अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिक्षण द्यावे. त्या टिकवल्या गेल्या तरच शिक्षणातील समानता आणि गुणवत्ता दोन्ही साध्य होतील,” असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. पोपट पवार यांनी केले. ते ‘सरकारी शाळा वाचवा अभियान’ आणि ‘मोफत शिक्षण न्याय…

शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी आवश्यक — डॉ. सुरेश पठारे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार हंडीनिमगाव (नेवासा फाटा) येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई पॅटर्न) यांच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर यांच्या वतीने एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन सीएसआरडी संस्थेच्या “एज्युव्हिजन 2040: शाश्वत भारतासाठी शाळा – सक्षम शिक्षक”…