देशपातळीवरील ‘सुपर १००’मध्ये माथणीच्या मंजुश्री घोरपडेची निवड

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी माथणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी मंजुश्री घोरपडे हिला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘वीरगाथा’ राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी,…

आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विनायक तोडमल, अश्विनी…

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

अहिल्यानगर | (पाथर्डी) प्रतिनिधी कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, संघभावना आणि सृजनशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती सदस्य मा. श्री मुरली तात्या भगत होते. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलासराव भगत यांच्या…

अहमदनगर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला तिसरे पेटंट; पर्यावरणपूरक शेतीसाठी महत्त्वपूर्ण संशोधन

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहमदनगर महाविद्यालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. अभिजित आहेर व डॉ. अविनाश गावडे यांना “संमिश्र नायट्रोजन खत व वनस्पती वाढ प्रवर्तक आणि त्याची निर्मिती प्रक्रिया” या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी भारतीय पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यशामुळे शेती व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत…

जोतिबा समजून घेतले तरच सावित्री होता येईल – प्रा. स्नेहा गायकवाड

अहिल्यानगर | प्रतिनिधी एक जोतिबा होते, ज्यांनी एक सावित्री घडवली; आणि त्या सावित्रीने अनेक सावित्र्या घडवल्या. आज आपण सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमान बाळगतो, त्याचे श्रेय फुले दाम्पत्यालाच जाते. आधुनिक काळातही पुरुषांकडून जोतिबांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळाले, तर प्रत्येक स्त्रीतील सावित्री बाहेर येईल. फुलेंचा सत्यशोधक विचार हा सत्य वर्तन, सत्य आचरण आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या समाज घडवणारा आहे. आजच्या…

मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना ‘शिक्षण महर्षी ग. ज. चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार’

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग. ज. चितांबर विद्या मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांना यावर्षीचा शिक्षण महर्षी ग. ज. चितांबर शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार विभावरी रोकडे यांना…

अहिल्यानगरच्या दिया–इशिकाने रोबोटिक्समध्ये जग जिंकले; शरद पवारांकडून अभिनंदन

अहिल्यानगर | प्रतिनिधी   उत्तर युरोपातील एस्टोनिया येथे आयोजित प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी जागतिक विक्रम प्रस्थापित करत देशाचे नाव उज्ज्वल केले. जगातील ७० देशांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशाबद्दल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार…

संस्कार आणि संस्कृतीचा संगम; आनंद पार्श्व गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील प्रख्यात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल शाळेचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा. तसेच संस्कार दिवाकर पूज्य आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वाद व प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. गुरुकुल परंपरेतील आधुनिक शिक्षणपद्धतीचे दर्शन घडवत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे…

चिमुकल्यांच्या सादरीकरणाने रंगले आनंद पार्श्व प्री-स्कूलचे स्नेहसंमेलन

अहिल्यानगर | जैनवार्ता राष्ट्रसंत आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषीजी म.सा. व संस्कारप्रेरक प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या नवीपेठ येथील आनंद पार्श्व प्री-स्कूलचे ९ वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ऋषीजींच्या पावन नवकार मंत्र जपाने करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी निर्मल बाफना,…

Education | शिष्यवृत्ती प्रस्ताव रखडले; विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी (Education) कचरा वेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संयुक्त मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रस्तावांच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आणि समाज कल्याण निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. पंचायतचे जिल्हाध्यक्ष विकास उडाणशिवे यांनी हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. (Education) शहरात सुका कचरा संकलन करून उदरनिर्वाह…