योग-ध्यानाने उजळला बालदिन : जे.एस.एस. गुरुकुलमध्ये ‘उत्कर्ष योग शिबिर’ उत्साहात

अहिल्यानगर | जैनवार्ता केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) मध्ये बालदिनानिमित्त आयोजित ‘उत्कर्ष योग शिबिर’ उत्साहात पार पडले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आयोजित या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अरणगाव रोड, रानवारा येथील गुरुकुलच्या नवीन वास्तूत पार पडलेल्या शिबिरात बेंगलोर…

“सरकारी शाळा टिकवणे म्हणजे राष्ट्र टिकवणे – पद्मश्री डॉ. पोपट पवार; ‘आडवाट’ लघुपट प्रदर्शनात शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात”

अहिल्यानगर | जैनवार्ता “सरकारी शाळा या राष्ट्रनिर्मितीचा खरा पाया आहेत. त्यातूनच अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिक्षण द्यावे. त्या टिकवल्या गेल्या तरच शिक्षणातील समानता आणि गुणवत्ता दोन्ही साध्य होतील,” असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. पोपट पवार यांनी केले. ते ‘सरकारी शाळा वाचवा अभियान’ आणि ‘मोफत शिक्षण न्याय…

शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी आवश्यक — डॉ. सुरेश पठारे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन

अहिल्यानगर | जैनवार्ता नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार हंडीनिमगाव (नेवासा फाटा) येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई पॅटर्न) यांच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर यांच्या वतीने एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन सीएसआरडी संस्थेच्या “एज्युव्हिजन 2040: शाश्वत भारतासाठी शाळा – सक्षम शिक्षक”…

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अहिल्यानगर | जैनवार्ता धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका व नगरपरिषद शाळा तसेच अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अनुदान योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल, इन्व्हर्टर किंवा जनरेटर यांसारख्या सुविधा निर्माण…

MDS Examination डॉ. पूर्वा भंडारी यांचे एमडीएस परीक्षेत उल्लेखनीय यश; रूट कॅनाल तज्ञ म्हणून प्रथम क्रमांक

पाथर्डी | जैनवार्ता ( MDS Examination ) श्री तिलोक जैन विद्यालयाच्या माजी प्राचार्य स्व. बन्सीलाल भंडारी यांची नात आणि प्राचार्य अजय भंडारी यांची सुकन्या डॉ. पूर्वा अजय भंडारी हिने लोणी येथील रूरल डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. (रूट कॅनाल तज्ञ) ही परीक्षा प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.    डॉ.पूर्वा हिने यापूर्वी…

CTET 2026: 8 फेब्रुवारीला देशभर परीक्षा; CBSE कडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने CTET 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. 21वी आवृत्ती रविवार, ८ फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये विविध भाषांमध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा दोन भागांमध्ये असेल — पेपर-I (इयत्ता 1 ते 5 साठी) आणि पेपर-II (इयत्ता 6 ते 8 साठी) —…

प्रयत्न नर्सिंग कॉलेजचा शत-टक्के यशाचा विश्वासू वारसा कायम

अहिल्यानगर | प्रतिनिधी सावेडी येथील गुलमोहर रोड परिसरात असलेल्या प्रयत्न फाऊंडेशनच्या प्रयत्न नर्सिंग कॉलेजने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्वल कामगिरी साधली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या ए.एन.एम अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थीनी उत्तम गुणांसह यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या आहेत. कु. दिक्षा सकपाळ…

मानसी चव्हाणची ‘अविष्कार’ स्पर्धेसाठी निवड; लाईनमन सुरक्षेसाठी साकारला ‘पासवर्ड बेस्ड सर्किट ब्रेकर’ प्रकल्प

अहिल्यानगर | जैनवार्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धा २०२५ साठी उपकेंद्र अहिल्यानगर येथील एफ.वाय. बी.एस्सी. डेटा सायन्स विभागातील कु. मानसी चव्हाण हिची निवड झाली आहे. ही स्पर्धा ११ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुणे विद्यापीठात पार पडणार आहे. कु. मानसी चव्हाण हिने जिल्हा पातळीवर “Password Based Circuit Breaker”…

भारतीय विद्यार्थिनीचा रोबोट थेट युरोपच्या मैदानात; अहिल्यानगर येथील दिया छाजेड आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर | जैनवार्ता पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी दिया प्रीतम छाजेड हिने देशभरातील हजारो स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. दियाने स्वतःच्या कल्पकतेवर आधारित “मोबाईलवर नियंत्रित शेतीसाठी उपयुक्त रोबोट” सादर केला. हा रोबोट नांगरणी, पेरणी, फवारणी, तसेच तापमान आणि आर्द्रतेचे…

टीईटी वादावर महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळ आणि गैरसमजांमुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी शासनाने तातडीने महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,…