जामखेड | प्रतिनिधी
जामखेड महाविद्यालयातील कु. स्नेहल विद्या दत्तात्रेय भोसले हिची पुन्हा एकदा ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी Khelo India University Games अंतर्गत जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या मल्लखांब स्पर्धेत स्नेहल भोसले हिने उत्कृष्ट कामगिरी करत Savitribai Phule Pune University संघाचे नेतृत्व केले होते. तिच्या प्रभावी खेळाच्या जोरावर पुणे विद्यापीठ संघाने सुवर्णपदक पटकावले होते.
स्नेहल ही S.Y. BSc ची विद्यार्थिनी असून, सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि कौशल्याच्या जोरावर तिने राज्यासह देशपातळीवर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. आता पुन्हा ‘खेलो इंडिया’साठी तिची निवड झाल्याने तिच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक तसेच सहाध्यायी विद्यार्थ्यांनी स्नेहलचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



