स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण

अहिल्यानगर (पाथर्डी ) | प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या आरोग्याची हमी देता येत नाही. रुग्णोपयोगी साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ग्रामपातळीवर साहित्य बँका सुरू व्हाव्यात, असे मत जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनीष बाहेती यांनी व्यक्त केले. जिल्हा सभेच्या पुढाकाराने माजी जिल्हाध्यक्ष स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण करण्यात आले….

CTET 2026: 8 फेब्रुवारीला देशभर परीक्षा; CBSE कडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने CTET 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. 21वी आवृत्ती रविवार, ८ फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये विविध भाषांमध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा दोन भागांमध्ये असेल — पेपर-I (इयत्ता 1 ते 5 साठी) आणि पेपर-II (इयत्ता 6 ते 8 साठी) —…

सिडनीत भारताचा सन्मानाचा विजय; रोहितचे शतक, कोहलीचे अर्धशतक

अहिल्यानगर | प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाने 236 धावा केल्या आणि भारताने 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. या विजयामुळे भारताने मालिकेचा शेवट सकारात्मक केला, जरी मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी रोखून धरत दडपणाखाली ठेवले. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग…

जिल्हास्तर युवा महोत्सव ३ व ४ नोव्हेंबरला; सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील तरुणाईच्या सर्वांगीण विकासाला चालना देत सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि नवोन्मेष जपण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली….

प्रयत्न नर्सिंग कॉलेजचा शत-टक्के यशाचा विश्वासू वारसा कायम

अहिल्यानगर | प्रतिनिधी सावेडी येथील गुलमोहर रोड परिसरात असलेल्या प्रयत्न फाऊंडेशनच्या प्रयत्न नर्सिंग कॉलेजने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उज्वल कामगिरी साधली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या ए.एन.एम अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सर्व विद्यार्थीनी उत्तम गुणांसह यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या आहेत. कु. दिक्षा सकपाळ…

‘यलो अलर्ट’चा इशारा! अहिल्यानगर जिल्ह्यात २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

अहिल्यानगर | प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने २२ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नद्यांतील पाणीपातळीत वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग वाढल्याने…

Ahilynagar job Alerts अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदासाठी तातडीची भरती

अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar job alerts: येथील नवनागापूर MIDC परिसरातील नामांकित क्लासिक व्हील्स लिमिटे या ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. अनुभवी तसेच नवीन (Freshers) उमेदवारांना या भरतीत संधी उपलब्ध आहे. उपलब्ध पदे आणि पात्रता: क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिंग रिक्त जागा 1 GDC Machine Operator SSC/HSC/Any ITI पुरुष 30 2…

पोलिस अधीक्षकांनी पारधी समाजाच्या पालावर साजरी केली दिवाळी. मुलांनी शिक्षण घेऊन महिला- पुरुषांनी रोजगार निर्माण करावा- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे.

अहिल्यानगर | जैनवार्ता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी आगळीवेगळी साजरी करत समाजाभिमुख दृष्टिकोनाचा आदर्श ठेवला. कामरगावा जवळील पारधी समाजाच्या पालावर सोमवारी भेट देत त्यांनी मिठाई व साडीचोळींचे वाटप केली. या उपक्रमामुळे पारधी वस्तीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तसेच…