शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अर्जाची अंतिम मुदत वाढवली ऑनलाइन अर्ज 31 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया चालू असून, अर्ज भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांची शाळास्तरावरून नोंदणी…

जवाहर नवोदय विद्यालयात ६वी प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला

अहिल्यानगर | प्रतिनिधी जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६वी प्रवेशासाठीची लेखी परीक्षा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ६४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली. परीक्षार्थींसाठीची प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर अनिवार्यपणे…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘आनंद सप्ताह’ उत्साहात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि रिमांड होम केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित ‘आनंद सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला. दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी, आत्मविश्‍वास आणि कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने सलग पाच दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रिमांड केंद्रातील सर्व शाळांमध्ये चित्रकला, ब्रेल लेखन, गायन, कथाकथन, नाट्यस्पर्धा आणि क्रीडा…

मतदान केंद्र असलेल्या शाळांना १ व २ डिसेंबरला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अहिल्यानगर | जैनवार्ता नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा,…

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला; परीक्षा परिषदेची नवीन घोषणा

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण…

शालेय कुराश स्पर्धेत बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा दबदबा; मुली व मुलांचा संघ विजेता

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शाळेच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींचा तसेच 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने शहरात प्रथम क्रमांक पटकावत प्रभावी कामगिरी साकारली. मुलींच्या विभागात 9 तर मुलांच्या विभागात 10 खेळाडूंनी सहभाग घेत…

न्यू आर्ट्‌स कॉलेजमध्ये फूड फेस्टिवला उत्स्फूर्त प्रतिसाद व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना विद्यार्थ्यांच्या अभिनव कल्पकतेतून लाखोंची उलाढाल

अहिल्यानगर | जैनवार्ता  न्यू आर्ट्‌स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर) फूड फेस्टिवल उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी आणि ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला चालना मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली….

नवभारत विद्यालय देहरे 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला

अहिल्यानगर | जैनवार्ता नवभारत विद्यालय देहरे येथील 1994 बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. तब्बल 31 वर्षांनी सर्व मित्रमंडळी एकत्र येत असल्याने आनंद आणि भावनांचा अनोखा संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला. हा मेळावा अहिल्यानगर येथील हॉटेल मेघनंद येथे पार पडला. राज्याच्या विविध भागांत कार्यरत असलेले…

लोणी येथे अस्मिता ॲथलेटिक्स लीग; जिल्ह्यातील मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – आयोजकांचे आवाहन

अहिल्यानगर | जैनवार्ता लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या लीगचे मुख्य उद्दिष्ट महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे,…

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेची सुरूवात; लहान मुलांच्या मोबाईल व्यसनाविरुद्ध मोठे पाऊल

पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती आवश्यक – सीईओ आनंद भंडारी अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्‌घाटन उत्साहात पार पडले. समाजात मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य…