सीना नदीला स्वच्छतेचा नवा श्वास; प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

अहिल्यानगर | प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’ अंतर्गत बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यम प्रकल्प विभाग व प्राधिकरण कार्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या मोहिमेत जलसंपदा विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता ओ. अं. भंडारी, जगदीश पाटील, यू. व्ही. कंगणकर, भूषण उबाळे, इंद्रजीत यादव यांच्यासह सुमारे ३५ ते ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाला महानगरपालिकेचीही साथ लाभली.

मनपाच्या सात कर्मचाऱ्यांनी तसेच दोन घंटागाड्यांच्या मदतीने नदीपात्रातील गोळा केलेला कचरा उचलून तो कचरा डेपोत पोहोचविण्यात आला. नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *