अहिल्यानगर | प्रतिनिधी
जिल्ह्यातील ॲड. साक्षी आदिनाथ जाधव यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी मुंबई येथील नॅशनल लॉ स्कूल (MNLU) मधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एलएलएम परीक्षा विशेष गुणवत्ता श्रेणीसह उत्तीर्ण होत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
विद्यापीठाचा भव्य पदवीदान समारंभ शनिवारी (ता. २८ मार्च) मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे उत्साहात पार पडला. या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराधे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साक्षी जाधव यांना पदवी प्रदान करण्यात आली. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला.
साक्षी जाधव या सध्या नगर जिल्हा न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ परिमल फळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअरशीप करत असून, त्यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध मेहनत आणि कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते.
त्या दैनिक नमो संघराज वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ तथा बाबा जाधव यांच्या कन्या आहेत.
साक्षी यांच्या या यशामुळे जाधव परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. रयत समाचार परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या



