प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या 64 व्या दीक्षादिनानिमित्त आनंदधाम येथे गुणानुवाद सभेचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी 

राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या परिसस्पर्शाने पावन बनलेल्या आनंदधाम येथे अविरत जैन साधू-संतांच्या आगमनामुळे श्रावक-श्राविकांना सतत गुरु दर्शन व सत्संगाचा लाभ मिळत असतो. त्याचबरोबर आचार्य भगवंत यांचे ज्येष्ठ शिष्यरत्न व महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या वास्तव्यामुळे श्रद्धाळू भक्तांना गुरु आशिर्वादाची विशेष प्राप्ती होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रवर्तक गुरुदेवांचा 65 वा दीक्षादिन महोत्सव शनिवार, 9 मे 2026 रोजी चतुर्विध संघाच्या पावन सानिध्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

उत्स्फूर्त वैराग्य भावनेने प्रेरित होऊन पूज्य गुरुदेवांनी 1962 मध्ये आचार्य भगवंत श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या सानिध्यात जैन भागवती दीक्षा ग्रहण केली होती. गुरु चरणी पूर्णपणे समर्पित राहून त्यांनी गुरुसेवेसह उत्कृष्ट संयम पालन केले. तसेच भारतातील विविध प्रांतांत विचरण करत जिनशासनाचा प्रचार-प्रसार केला.

92 वर्षांच्या वयातही गुरुदेव संयम साधनेत सजग असून, अशा ज्येष्ठ-श्रेष्ठ सद्गुरूंची संयम अनुमोदना करण्याची संधी मिळणे हे मोठे सद्भाग्य असल्याची भावना जैन समाजातून व्यक्त होत आहे.

शनिवार, 9 मे रोजी सकाळी 8:45 वाजता महामंत्र नवकार जापाने कार्यक्रमास प्रारंभ होणार असून त्यानंतर दीर्घ संयम अनुमोदना व गुरु गुणानुवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास सर्व श्रद्धाळू भक्तांनी सपरिवार व श्रीसंघासह उपस्थित राहून गुरु चरणी श्रद्धा-भक्ती अर्पण करावी, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *