jainwarta

अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर – जनजीवन विस्कळीत; 4 जण गेले वाहून, दोन वाचले, दोघांचा शोध सुरू

अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar rain news: अहिल्यानगर जिल्ह्यात काल ता. २७ सप्टेंबर संध्याकाळपासून ते ता. २८ सप्टेंबर पहाटेपर्यंत संततधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. अहमदनगर शहरात सीना नदीला पूर आला असून कल्याण रोड बंद आहे. पुराचे पाणी नेप्ती नाका…

गुगलचा वाढदिवस : डिजिटल क्रांतीचा महोत्सव

  अहमदनगर | प्रतिनिधी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी खास आहे. कारण आजच्याच दिवशी जगाला माहितीचा महासागर खुला करून देणाऱ्या ‘गुगल’चा वाढदिवस साजरा केला जातो. १९९८ साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील दोन तरुण संशोधक – लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन – यांनी सुरू केलेल्या या सर्च इंजिनने केवळ शोध प्रक्रिया बदलली नाही, तर आधुनिक जगाची…

सीसीएमपी रजिस्ट्रेशन प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची मागणी एमएमसी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्सनंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही एमएमसी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या डॉक्टरांनी केला आहे. या संदर्भात डॉ. दिलीप दत्तात्रय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून तातडीने…

बुऱ्हाणनगरमध्ये तुळजाभवानी पालखीचे पूजन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – तुळजापूरला विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी नेल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन गुरुवारी बुऱ्हाणनगर येथे झाले. दुपारी १२ वाजता आमदार शिवाजी कर्डीले, युवा नेते अक्षय कर्डीले, संदीप कर्डीले व सरपंच रावसाहेब कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जयघोष, ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.   पालखी मिरवणुकीपूर्वी देवी…

जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा; आयुर्वेद तज्ञांचा गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी   जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि अजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला.   या कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई…

छायाताई फिरोदिया यांना जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा जीवन गौरव पुरस्कार

अहिल्यानगर प्रतिनिधी समाजकार्यातील उल्लेखनीय कार्य, अखंड जनसेवा आणि संघटनात्मक नेतृत्वाची भक्कम पायाभरणी यांची दखल घेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.   या गौरवामुळे फिरोदिया यांच्या कार्याचा व्यापक सन्मान झाला असून, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची ठळक नोंद…

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्या भडके यांना प्रदान शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिक्षिका विद्या रामभाऊ भडके यांना मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री…

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती

अहिल्यानगर | प्रतिनिधी महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. दक्षिण दिशेचे स्टेशनरोडवरील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्याने भरून गेला आहे. परिणामी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे निवासस्थानच जणू एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यासारखे वाटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचून चिखल राडारोडा तयार झाला आहे. या ठिकाणी…

घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्य वाटप

पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा ने पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. अलीकडील पुरामुळे करंजी येथील 16 घरे पूर्णपणे वाहून गेली असून, कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत….