पांगरमल गावात नुकसानीचे पंचनामे सुरू; भीमराज आव्हाड यांचे उपोषण स्थगित
नगर | प्रतिनिधी नगर तालुक्यातील पांगरमल गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. ग्रामसेविका वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींवरून पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत शेतकऱ्यांसह उपोषणास सुरुवात केली. यावेळी पांडुरंग आव्हाड,…
