अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अहिल्यानगर | जैनवार्ता धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका व नगरपरिषद शाळा तसेच अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अनुदान योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल, इन्व्हर्टर किंवा जनरेटर यांसारख्या सुविधा निर्माण…
