महाज्योतीचा स्पष्ट खुलासा : एकही प्रशिक्षण बंद नाही; २०२६–२७ पासून काही अभ्यासक्रम ऑनलाईन

मुंबई | २४ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद किंवा ठप्प नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही अभ्यासक्रम २०२६–२७ या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची…

सायबर रॅकेटचा ‘मास्टरमाईंड’ पकडला; लाओसमधून ऑनलाईन गुंतवणूकीचा ट्रॅप अहमदाबाद विमानतळावर अटक

सोलापूर | २१.२ | प्रतिनिधी सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अखेर अटक करून मोठी कामगिरी बजावली. लाओस येथे वास्तव्यास राहून आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर रॅकेट चालवणारा ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा (वय ४७, रा. पलावा सिटी, डोंबिवली) याला लुक आऊट नोटीसच्या आधारे ९ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद…

राजर्षी शाहू जन्मस्थळी ‘शाहू संग्रहालय’चे २१ फेब्रुवारीला लोकार्पण; स्वप्न साकार; १९ वर्षांच्या अथक पाठपुरावा

कोल्हापूर | २०.२ |प्रतिनिधी येथील कसबा बावडामधे असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अखेर ऐतिहासिक ‘शाहू संग्रहालय’ साकार झाले असून, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे. याविषयी माहिती देताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कसबा बावडा येथील…

(Education) शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख टाळा; पिंपरी चिंचवड मनपाचे मुख्याध्यापकांना आदेश

पिंपरी | प्रतिनिधी (Education) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर (LC) जात नमूद करताना त्यापुढे धर्माचा उल्लेख केल्यास असा दाखला जात पडताळणीसाठी अवैध ठरण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. दाखल्यांवर केवळ ‘जमातीचा’ उल्लेख करावा आणि धर्माचा उल्लेख टाळावा, असे आदेश…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन; जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

पुणे | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन समारंभासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते यावर्षीचे…

शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला; परीक्षा परिषदेची नवीन घोषणा

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण…

दिव्यांगांसाठी तंत्रज्ञानाचा नवा हात — एआय आधारित WhatsApp चैटबॉटची सुरूवात

मुंबई | प्रतिनिधी दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांची माहिती आणि तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाने एआय (AI) आधारित WhatsApp Chatbot (क्रमांक: 7821922775) सुरू केला असून, या नव्या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि तक्रार नोंदणीची सुविधा आता केवळ एका क्लिकवर उपलब्ध झाली…

‘HND बोर्डिंग’ प्रकरणात नवी दिशा; राजू शेट्टींची ‘जैन बोर्डिंग ट्रस्ट’चे नाव पुनर्स्थापनाची मागणी

कोल्हापूर | जैनवार्ता भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी ‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ असे भगवान महावीरांच्या शिकवणीवर आधारित ट्विट केल्यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. राजू शेट्टी म्हणाले की, “धर्मादाय आयुक्तांनी HND बोर्डिंगचा व्यवहार दोन्ही बाजूंनी रद्द केल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ज्या वेगाने ट्रस्टची खरेदी…

TIFR च्या संशोधन बलूनचा प्रवास महाराष्ट्रात; अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागांना सतर्कतेचे निर्देश

अहिल्यानगर | जैनवार्ता हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनमधील काही उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या संशोधन उपक्रमाला भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि…

संविधान मूल्यांचा संदेश संत साहित्याच्या माध्यमातून; ओबीसीतील ४४ जाती एकत्र आणणाऱ्या संघटनेचा उपक्रम

अमरावती | जैनवार्ता अमरावती जिल्ह्यात वैचारिक चळवळींचे समन्वयित कार्य सातत्याने व्यापक होत. त्याचाच भाग म्हणून कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावरील संविधान प्रवचन नुकतेच पार पडले. या प्रवचनाचे आयोजन डॉ. श्रीराम कोल्हे आणि वासुदेव चौधरी यांच्या अभिनव सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आले. अलुतेदार–बलुतेदार प्रवर्गातील तब्बल…