200 मीटर अ‍ॅथलेटिक्समध्ये सीएसआरडीचा शुभम हंबीररावची इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय गेम्ससाठी निवड

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या CSRD-ISWR समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यूचा विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील युवा धावपटू शुभम अरुण हंबीरराव यांची 200 मीटर अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. Youth Games Council India (YGCI) यांच्या वतीने आयोजित 8th Youth Games Indo-Nepal International Series 2026 या स्पर्धेसाठी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आले आहे….

आनंदधाम येथे संत द्वयांचे पुण्यस्मरण; गुणानुवाद, मासिक जाप व प्रवचन मालिकेची सुरुवात

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथील आनंदधाम येथे १९ व्या शतकातील जैन धर्मीयांचे द्वितीय पट्टधर आचार्य राष्ट्रसंत श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दोन महान साधू महात्म्यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आत्मार्थी श्री मोहनऋषिजी म.सा. आणि तपस्वी रत्न श्री मगनमुनिजी म.सा. या गुरुद्वयांनी आपले संयमी जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि…

अहिल्यानगर मनपा समित्यांची घोषणा; स्थायी, महिला-बालकल्याण सदस्य व स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या सभेला महापौर ज्योतीताई गाडे अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त यशवंत डांगे व उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल…

Agriculture | सेन्सरयुक्त स्मार्ट शेतीचा नवा अध्याय; डॉ. प्रणव पावसे यांच्या संशोधनाला ‘नाबार्ड’चा राष्ट्रीय गौरव

संगमनेर | २२.२ | नितीनचंद्र भालेराव (Agriculture) रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा पोत ढासळत असताना आणि त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जाणवत असताना, संगमनेरच्या एका युवा संशोधकाने शेतीसाठी अभिनव उपाय सुचवला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुपुत्र डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांच्या पीएच.डी. संशोधनाला National Bank for Agriculture and Rural Development (नाबार्ड) कडून २०२३ सालचा…

सीएसआरडीमध्ये शिवजयंती उत्साहात; स्वराज्य, सामाजिक न्याय व एकतेचा संदेश

अहिल्यानगर | २२.२ | प्रतिनिधी येथील CSRD–ISWR (भा.पां. हिवाळे शिक्षणसंस्था) येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला संचालक प्रा. डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदीप जारे, डॉ. विजय संसारे, आसावरी झपके, डॉ. जेमोन वर्गीस,…

माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेची दुहेरी कामगिरी; सलग दोन वर्षांत ११ कोटींचा राज्यस्तरीय गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळाले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. यापूर्वी माझी वसुंधरा ४.० अभियानातही महानगरपालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत ६ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला होता….

मागासवर्गीयांच्या निधीचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा- वंचित बहुजन आघाडी; झेडपी मुख्याधिकारी भंडारी यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | २१.२ | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी सलग तीन वर्षे खर्च न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी…

श्री आनंद पार्श्व गुरुकुलात ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’तर्फे मोफत दंत तपासणी शिबिर

अहिल्यानगर | प्रतिनिधी ( Helth )केडगाव येथील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’ (Rural Dental Health Awareness) पथकाच्या वतीने मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ( Helth )या शिबिरात तज्ज्ञ दंतवैद्य डॉ. ओमकार भालसिंग, डॉ. शिल्पा, डॉ. प्रियंका झावरे, डॉ….

आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विनायक तोडमल, अश्विनी…

गोव्यात लांब उडीत सुवर्णझेप; धाराशिवचा आदित्य साठे राष्ट्रीय विजेता

  अहिल्यानगर | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र साठे आदित्य अशोक याने ॲथलेटिक्सच्या लांब उडी स्पर्धेत दमदार कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिनांक 20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,…