शिवजयंतीला विधायकतेची जोड; भव्य स्वागत कमानीचे भूमिपूजन

नगर तालुका | प्रतिनिधी शिवजयंती उत्सवाला प्रबोधनाची आणि विधायकतेची जोड देत इसळक गावातील तरुणांनी यंदा आदर्श उपक्रम हाती घेतले. गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘शिवजयंती उत्सव समिती’ची स्थापना केली असून, महापुरुषांची जयंती व पुण्यतिधी साजरी करताना वाढत चाललेल्या विकृत व दिखाऊ परंपरांना फाटा देण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे शिस्त, स्वाभिमान, समाजहित आणि राष्ट्रनिष्ठा…

(Special) महाशिवरात्री विशेष: पिंपळगाव ते डोंगरगण ‘आरोग्य दिंडी’; समृद्धी ट्रेकिंग ग्रुपचा अनोखा उपक्रम

नगर तालुका | प्रतिनिधी पिंपळगाव माळवी येथील समृद्धी योगा व ट्रेकिंग ग्रुप हा युवक-युवतींचा सक्रिय गट असून दर रविवारी परिसरातील डोंगरदऱ्यांवर ट्रेकिंग तसेच नियमित योगा, प्राणायाम व सूर्यनमस्कार वर्गांचे आयोजन करत असतो. गेल्या वर्षभरात ग्रुपने विविध पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उप(Special)क्रम राबवून समाजकार्याची वेगळी ओळख निर्माण…

श्री आनंद पार्श्व गुरुकुलात ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’तर्फे मोफत दंत तपासणी शिबिर

अहिल्यानगर | प्रतिनिधी ( Helth )केडगाव येथील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’ (Rural Dental Health Awareness) पथकाच्या वतीने मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ( Helth )या शिबिरात तज्ज्ञ दंतवैद्य डॉ. ओमकार भालसिंग, डॉ. शिल्पा, डॉ. प्रियंका झावरे, डॉ….

परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याची संधी; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांनी ही माहिती दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता जागतिक स्तरावर…

देशपातळीवरील ‘सुपर १००’मध्ये माथणीच्या मंजुश्री घोरपडेची निवड

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी माथणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी मंजुश्री घोरपडे हिला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘वीरगाथा’ राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी,…

धोत्रे जि. प. शाळेचा ‘मातीशी नातं’ उपक्रम; शाळेतच शेतीमालाची थेट विक्री

पारनेर | प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे शिक्षकांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘मातीशी नातं’ या उपक्रमामुळे शिक्षणासोबतच ग्रामविकासालाही नवी दिशा मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेत स्वतंत्र ‘मातीशी नातं’ कक्ष सुरू करण्यात आला असून गावातील शेतकऱ्यांचा शेतीमाल व कडधान्ये थेट विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळत असून…

आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विनायक तोडमल, अश्विनी…

गोव्यात लांब उडीत सुवर्णझेप; धाराशिवचा आदित्य साठे राष्ट्रीय विजेता

  अहिल्यानगर | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र साठे आदित्य अशोक याने ॲथलेटिक्सच्या लांब उडी स्पर्धेत दमदार कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. दिनांक 20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,…

गोव्याच्या ट्रॅकवर अहिल्यानगरची सुवर्णधाव; शुभम हंबीररावला 200 मीटरमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक

गोवा | प्रतिनिधी भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र शुभम सीमा अरुण हंबीरराव याने ॲथलेटिक्सच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे 20, 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील…

श्री आनंद पार्श्व गुरुकुल केडगाव येथे मकर संक्रांती उत्साहात साजरी

अहिल्यानगर | प्रतिनिधी “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” हा स्नेहाचा संदेश देत तसेच शाळेच्या नवीन इमारतीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल, केडगाव (अहिल्यानगर) येथे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या आवारात विविध सांस्कृतिक व उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची…