त्रिवेणी संगमातून अक्षय पुण्यप्राप्तीचा योग; आनंदधाम येथे वर्षीतप पारणा सोहळा

अहिल्यानगर | प्रतिनिधी

वैशाख शुध्द तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया जैन धर्मा प्रमाणे हिंदू धर्मातही या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केले जाणारे सत्कार्य अनंत गुणा फलप्राप्ति देते. तसेच हा दिवस साडे तीन मुहुर्तां पैकी एक मुहुर्त आहे.

जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या तपसाधनेमुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या दान – शील – तप – भाव पैकी दान व तप चा प्रारंभ या दिवसापासून झाला. भगवान ऋषभदेव यांच्या वर्षीतप चा पारणा श्रेयांसकुमार द्वारा सुपात्र दान देऊन झाला.

वर्षीतप पारणा ही पवित्र परंपरा दीर्घ काळानंतरही आजतागायत जैन धर्मावलंबी जपत आहेत.

राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री प पू आनंदऋषिजी यांच्या पावन सानिध्यात आनंदधाम येथे वर्षीतप तपस्वींच्या पारणा समारोहाची सुरुवात झाली. ४५ वर्षांपासून डामडौल रहित, भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

यावर्षी सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषिजी, प्रबुध्द विचारक आदर्शऋषिजी, संस्कार दिवाकर आलोकऋषिजी इत्यादी साधु – साध्वी महाराजांच्या पावन सानिध्यात संपन्न होत असलेल्या वर्षीतप पारणा समारोहासाठी महाराष्ट्रातील तसेच अन्य प्रांतातील शेकडो तपस्वी येणार आहेत. तसेच तपस्वी साधु संतांचे पारणे होणार आहेत.

आचार्य आनंदऋषिजी म सा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमिवर साधु – संतांच्या दर्शनाचा, प्रवचन, सत्संगाचा लाभ घेऊन वर्षीतप तप अनुमोदना करण्यासाठी सर्व श्रावक – श्राविकांनी जास्तीत जास्त संख्येने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे.

आनंदमय उर्जा, गुरु सत्संग व तप अनुमोदना या त्रिवेणी संगम द्वारा अक्षय पुण्य प्राप्ति चा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड च्या वतीने करण्यात आले आहे.

सेवाभावी श्री सागरजी गोकुळजी गांधी – गांधी परिवार कडून सर्वांसाठी गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *