बुऱ्हाणनगरमध्ये तुळजाभवानी पालखीचे पूजन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – तुळजापूरला विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी नेल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन गुरुवारी बुऱ्हाणनगर येथे झाले. दुपारी १२ वाजता आमदार शिवाजी कर्डीले, युवा नेते अक्षय कर्डीले, संदीप कर्डीले व सरपंच रावसाहेब कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जयघोष, ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीपूर्वी देवी…
जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा; आयुर्वेद तज्ञांचा गौरव
अहिल्यानगर | प्रतिनिधी जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि अजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई…
छायाताई फिरोदिया यांना जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा जीवन गौरव पुरस्कार
अहिल्यानगर प्रतिनिधी समाजकार्यातील उल्लेखनीय कार्य, अखंड जनसेवा आणि संघटनात्मक नेतृत्वाची भक्कम पायाभरणी यांची दखल घेत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे फिरोदिया यांच्या कार्याचा व्यापक सन्मान झाला असून, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची ठळक नोंद…
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्या भडके यांना प्रदान शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव
अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिक्षिका विद्या रामभाऊ भडके यांना मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री…
जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती
अहिल्यानगर | प्रतिनिधी महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. दक्षिण दिशेचे स्टेशनरोडवरील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्याने भरून गेला आहे. परिणामी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे निवासस्थानच जणू एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यासारखे वाटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचून चिखल राडारोडा तयार झाला आहे. या ठिकाणी…
घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप
पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा ने पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. अलीकडील पुरामुळे करंजी येथील 16 घरे पूर्णपणे वाहून गेली असून, कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत….
केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना उत्साहात; शेतकऱ्यांसाठी देवीला साकडे
नवरात्रोत्सवाचा उत्साह : केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना भाविकांचे श्रद्धास्थान – रेणुका मातेला साकडे घालून शेतकऱ्यांच्या उन्नतीची प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केडगाव येथील रेणुका माता देवी मंदिरात घटस्थापना व महाआरतीचा सोहळा अतिशय धार्मिक वातावरणात पार पडला. या वेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि फुलांच्या सजावटीने दुमदुमून गेला. हा सोहळा प्रवीण कोतकर…
पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन
अहिल्यानगर | प्रतिनिधी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा लोककल्याणकारी आदर्श जीवनपट आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान युवकांना समजून घेता यावे आणि त्यातून युवकांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या जयंती निमित्त गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यात महाविद्यालयीन निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी…
लाडकी बहीण योजनेचे मानधन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Ladki Bahin Yojana E-KYC:महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासूनच विरोधकांनी सडकून टीका केली होती. तरीही या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू झाली असून, लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. २६.३४ लाख लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखले महिला…
